प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा / जावली
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांचे स्वागत करताना सरपंच संतोष बांदल व मान्यवर.
मेढा (जावली) : दि.१६ सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांनी जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बिभवी या शाळेला भेट दिली.यावेळी जावलीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,अमित पवेकर,आर.टी.दळवी,उस्मान मणेर,केंद्रप्रमुख मिलन मुळे,दत्तात्रय बाचल हे मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आदर्श शाळा उपक्रमांतर्गत बिभवी प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांविषयी व इमारतीबाबत माहिती दिली.
यावेळी याशनी नागराजन मॅडम यांनी आदर्श शाळा इमारतीची पाहणी केली.यावेळी त्यांनी शाळेची इमारत पाहून समाधान व्यक्त केले तसेच काही मार्गदर्शक सूचना केल्या.लोकसहभागाबद्दल कौतुक केले.यावेळी शाळेच्या वतीने सरपंच संतोष बांदल यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख,एकनाथ देशमुख,दत्तात्रय बांदल,प्रविण देशमुख,गंगाराम देशमुख,तुकाराम देशमुख,तेजस जाधव,आरती परिहार,दिपाली देशमुख,कॉन्ट्रॅक्टर सचिन धनावडे,शाळेतील शिक्षक दिपाली दुंदळे,अमिता एरंडे,शरद गव्हाणे,लहुराज जाधव,अमित आगोंडे,विशाल महाजन,सुरेखा पवार,स्नेहल देशमुख,सुमल बांदल यांच्यासह बांधकाम विभागातील कर्मचारी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment