प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील)
खटाव / सातारा
▪️ गुरसाळे येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन
▪️ शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश!
▪️ गुरसाळे सह अक्ख्या निमसोड जिल्हा परिषद गटाच्या वतीने मंत्री जयकुमार गोरेंचा भव्य नागरी सत्कार!
▪️ सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आदींसह गुरसाळे गावाचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
खटाव (सातारा) : गुरसाळे तालुका खटाव येथे निमसोड जिल्हा परिषद गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार, विविध विकासकामांचे भूमिपूजन,लोकार्पण आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला.
मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या श्री सोमेश्वर मंदिराच्या परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण निमसोड जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कामांमुळे गावाच्या पायाभूत आणि आध्यात्मिक सुविधांमध्ये चांगला विकास होणार असून, आगामी काळात देखील अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून या भागातील गावांचा सर्वांगीण विकास करणार असून "वरुण राजाच्या कृपेने हा कार्यक्रम या सोमेश्वर मंदिरात घेण्यात आला.ज्या गुरसाळे गावात सुरुवातीला मला यायचं म्हणलं तरी कुणाकडे जायचं? असा प्रश्न पडायचा. आता तर सोमेश्वराच्या कृपेनें चार वेळा आमदार आहे. आणि आता ग्रामविकास मंत्री झालोय.
येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ३ कोटी रुपयांचा निधी देणार असून पुरातन धर्तीवर हे मंदिर उभारण्यात येणार असल्याचं जयकुमार गोरे (भाऊ) यांनी यावेळी सांगितलं. अचानक न मागता मंदिर कामासाठी एवढा मोठा निधी घोषित केल्यानं उपस्थित सगळे आश्चर्य चकित झाले.यावेळी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात यावं, असं आवाहनही ना.गोरेंनी केलं.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवत, प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाला सातारा, सोलापूर जिल्ह्यात असलेला पाठिंबा वाढत आहे. माण खटाव विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी भाजपाच्या राष्ट्रप्रेमी विचारांना स्वीकारत पक्ष प्रवेश करत आहेत.
निमसोड जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय समाज पक्षातील प्रमुख कार्यकर्ते,सरपंच, पक्षीय पदाधिकारी यांनी निमसोड जिल्हा परिषद गटाच्या वतीने गुरसाळे येथे आयोजित ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात भारतीय जनता पक्ष परिवारात प्रवेश केला. या सर्वांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षात स्वागत केले. आगामी काळात सर्वांनी एकजुटीने भाजपा वाढीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी केला.
यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर,युवा नेते अंकुश भाऊ गोरे, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, युवानेते विक्रमशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.बंडा गोडसे, ज्येष्ठनेते हरिभाऊ जगदाळे, माण खटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, विधानसभा संयोजक युवानेते विशाल बागल, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, खटाव तालुका माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण, वडूज नगरीच्या नगराध्यक्ष सौ. रेश्मा बनसोडे,भाजपा खटाव तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे, माजी पंचायत समिती सदस्य, डॉ.विवेक देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य भरतशेठ जाधव,जयसिंगराव जाधव, डॉ.बाळासाहेब झेंडे, मधुकर (बापू) इंगळे, माजी सरपंच महेंद देशमुख, कॉन्ट्रॅक्टर नीलेश जाधव, युवामोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे,संजय शेठ शितोळे, छगन शितोळे,निवेदक चंद्रकांत कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तर यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, जयहिंद शितोळे हेमंत शितोळे,सूरज शितोळे, मोहन शितोळे, विजय सांगवे, गुरसाळे येथील प्रमुख नेते प्रताप जाधव,डॉ.किरण जाधव,बाजीराव जाधव, खुद्बुद्धीन शिकलगार, रामचंद्र जाधव, मारुती जाधव गुरुजी,दिनकर जाधव गुरुजी, चेअरमन साहेबराव पाटोळे,व्हाईस चेअरमन संगीता डोईफोडे,सरपंच हसन शिकलागर, उपसरपंच सागर झेंडे,ऍड रोहन जाधव,निलेश पवार ,कृष्णत जाधव,रेखा जाधव,नंदा कोकरे ,मंगल पाटोळे,रंजना जाधव,पद्मावती जाधव ,रुक्मिणी जाधव, J.P.जाधव सर,सचिन जाधव ,दत्ता मगर प्रशांत वाघ ,विजय जाधव ,सुनील जाधव, विश्वास जाधव,पोपट झरे, सुषमा जाधव, जगन्नाथ जाधव,राम झेंडे शिरसवडी येथील देवानंद यादव, रेवण इंगळे, युवराज इंगळे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपाचा झेंडा हाती घेतला.
न्युज मराठी लाईव्ह
खटाव / सातारा







Post a Comment