सचिन वावरे यांची गणेशवाडीच्या उपसरपंचपदी निवड

प्रतिनिधी / श्री.लालासाहेब माने (पाटील)
खटाव / सातारा 


सातारा : गणेशवाडी ता.खटाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन वावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी कार्यरत असलेल्या उपसरपंच स्वाती शिंगाडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालेले होते त्या ठिकाणी नूतन उपसरपंचपदी सचिन वावरे यांची बिनविरोध निवड झाली.
             

गणेशवाडी ता. खटाव ग्रामपंचायत पार्टी अंतर्गत समझोत्यानुसार कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर स्वाती शिंगाडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला व उपसरपंच पद रिक्त झाले होते त्याठिकाणी सचिन वावरे यांना बिनविरोध उपसरपंच पदी निवडण्यात आले.


गावातील लोकांनी ठेवलेला विश्वास आणि ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे माझी या पदावर निवड झाली असून या पदाचा वापर गावच्या सर्वांगीण विकासासाठी करून गावांमध्ये विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न करेन असे मनोगत उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना उपसरपंच सचिन वावरे यांनी यावेळी केले.
                  
या निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वडूज मंडल अधिकारी अभय शिंदे यांनी काम केले तर ग्रामसेवक अमोल माने व लिपिक विजया पोतदार यांनी सहकार्य केले.
               
याप्रसंगी सरपंच पोपट राऊत, सोमनाथ घाडगे, सागर सजगणे, मनोहर साळुंखे, कुंडलिक राऊत, शंतनु आस्मे, रमेश शिंगाडे, स्वाती शिंगाडे, भिमराव साळुंखे, नारायण गलांडे, सचिन राऊत, अशोक घाडगे, अंकुश राऊत, गोरख काळे , विजय कोळेकर यांची उपस्थिती होती तर या निवडी बद्दल खटाव तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी शुभेच्छा दिल्या.


न्युज मराठी लाईव्ह 
खटाव / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post