उदय दिलीप सूत्रधर चे खेलो सातारा मध्ये यश

प्रतिनिधी / श्री.संजय वांगडे
मेढा / जावली


सातारा : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत खेलो सातारा अंतर्गत म्हसवड येथे होणाऱ्या निवासी क्रीडा कॅम्पसाठी तालुकास्तरीय विद्यार्थी निवड चाचणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 100 मी धावणे या खेळ प्रकारात उदय दिलीप सूत्रधर शाळा निझरे इयत्ता ६ वी याने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे त्याची म्हसवड येथील निवासी कॅम्पसाठी निवड झाली आहे.
   
कु.श्रेया विनोद इंगुळकर इयत्ता ६ वी हिने 400 मी धावणे खेळ प्रकारात तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तर दर्शन ज्ञानेश्वर कराळे इयत्ता ६ वी याने बुद्धिबळ मध्ये तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकवला.

निझरे शाळेला मिळालेल्या या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मा.गटशिक्षणाधिकारी जावली श्री संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,रघुनाथ दळवी, उस्मान मणेर,केंद्रप्रमुख मिलन मुळे, हंबीरराव जगताप, बळवंत पाडळे, सुभाष दुटाळ, निझरे सरपंच सतिष भिलारे, उपसरपंच युवराज साळुंखे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ रेखा शंकर शेडगे , उपाध्यक्षा पूनम शेडगे व माजी उपसरपंच शकुंतला भिलारे मॅडम आदींनी अभिनंदन केले.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post