श्री.लालासाहेब माने (पाटील)
प्रतिनिधी / खटाव (सातारा)
खटाव (सातारा) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत मान खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांच्यासाठी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव या ठिकाणी संपन्न होत आहे. या प्रशिक्षणाचे प्रमुख अधिव्याख्याता श्री विजयकुमार कोकरे यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील साधन व्यक्ती व सुलभक यांचे मार्फत प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणासाठी 200 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून सहा वर्ग खोल्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे
प्रशिक्षणाची वेळ सकाळी साडेनऊ ते सहा अशी असून ऑनलाईन उपस्थिती असल्यामुळे कोणालाही हे प्रशिक्षण टाळता येत नाही
दिवसभरात एकूण होणाऱ्या तासिका त्यानंतर होणारी चाचणी परीक्षा अशा पद्धतीचे नियोजन असल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व अभ्यासक्रम आराखडा यानुसार सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सेवागिरी विद्यालयामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रशिक्षण यशस्वी होण्यास मदत होत आहे. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सुलभकांच्या मार्फत अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणार्थींना समजेल अशा पद्धतीने या प्रशिक्षणातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणारा बदल व अभ्यासक्रमाचा नियोजित आराखडा तयार करून त्यावर आधारित स्वाध्याय प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशिक्षणार्थी यांची आहे याचा फायदा प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या आस्थापनेच्या ठिकाणी होणार असून निश्चितपणे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव चे प्राचार्य श्री ए बी सावंत सर यांच्या हस्ते अधिव्याख्याता श्री विजयकुमार कोकरे यांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर सर्व सुलभक यांचे स्वागत करून परिपाठ घेऊन प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले यावेळी श्री कोकरे साहेब यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना स्वागत करून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक प्रमोद राऊत सर व गुरव सर यांनी केले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खटाव (सातारा)



Post a Comment