पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मेढा येथे उत्साहात साजरी.

श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली) 


मेढा (जावली) : येथील स्तिथ असलेले धनगर समाज बांधव आणि आजूबाजूचे स्थित असलेले धनगर समाज बांधव इतर समाज बांधव यांनी अनोख्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन केले. 

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा सुंदर देखावा , पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य दिव्य मिरवणूक झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मेढा आगार व्यवस्थापिका सौ.नीता बाबर आणि वाहतूक निरीक्षक मेढा आगार श्री.अजित मुगडे निझरे गावचे सुपुत्र समाज प्रबोधनकार सातारा पोलीस श्री.भरत जाधव साहेब यांचे सुंदर अशी व्याख्यान सेवा झाली. 

कार्यक्रमाची प्रस्तावना रवींद्र हिरवे यांनी केली यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये समाज प्रबोधनकार व्याख्यानकार भरत जाधव सातारा पोलीस समाजसेवक यांचे व्याख्यान जीवन म्हणजे काय ?या विषयावर व्याख्यान केले तरुण पिढीसाठी चांगले उपदेश केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला, त्यानंतर मेरूलिंग ओविकार मंडळ धनगरी ओवींचा सुंदर कार्यक्रम करण्यात आला. 

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थिती दाखवली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करून समाज बांधवास शुभेच्छा दिल्या.यावेळी मनोज हिरवे ,संजय शिंदे ,रवींद्र हिरवे ,विलास शिंदे ,संतोष गोरे ,सुरज शिंदे ,प्रकाश गोरे ,सचिन गोरे ,संतोष ढेबे, प्रकाश शिंदे ,अशोक शिंदे आदी उपस्थित होते.


न्युज मराठी लाईव्ह 
मेढा (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post