श्री.गणेश मंडपे
प्रतिनिधी / जालना
जालना : जिल्ह्यातील मौजे पारडगांव तालुका घनसावंगी येथे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या शिफारसी ने खासदार संजय जाधव यांच्या खासदार फंडा मधून श्री जोगेश्वरी काल भैरवनाथ मंदिर पारडगांव सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गावातील माजी सरपंच व सदस्य श्री चंद्रभुषण जैस्वाल, तसेच बालासाहेब ढेरे पाटील, शिवाजीराव भालेकर,प्रकाश कोकणे, कल्याण भाऊ सपाटे,रहिमतुला भाई शेख, सोमनाथ मंडपे,अनिल सातपुते, संभाजी ताठे, रामु ढेरे पाटील,बाबुराव कुलकर्णी हे गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मंदिराच्या विकासा करीता माजी मंत्री राजेश टोपे यांनी 10 लक्ष निधी वर्ष 2024 ते 2025 या वर्षात उपलब्ध केला आहे, या मंदिराच्या विकासाला गती देण्याचे काम, गावातील उद्योजक जैस्वाल यांच्या परिवाने केला आहे, तसेच समस्त गावकरी वर्गाचे मोठे योगदान आहे, आज या सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / जालना



टिप्पणी पोस्ट करा