श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड
वेंकटेश्वरा को. ऑप. ऍग्रो प्रोसेसिंग प्रा. लि.संस्थेच्या च्या माध्यमातून उपक्रम
कराड : रासायनिक खते, बदलते हवामान, शेतमालाला मिळणारा अल्प हमी भाव, शासन योजनांची अंमलबजावणीतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्ये सारख्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेती वाचवण्यासाठी वेंकटेश्वरा को. ऑप. ऍग्रो प्रोसेसिंग प्रा. लि. या संस्थेच्या वतीने 10 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाउन हॉल) मध्ये भव्य कृषी संमेलन व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेचे चेअरमन डॉ.शिवाजीराव डोळे हे मेळाव्याचे अध्यक्ष असून, अनिल पांडे आणि विवेकानंद वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन, नव्या शेती पद्धती, शाश्वत शेतीचा मार्ग, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.
या संमेलनात तज्ज्ञ मार्गदर्शक शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल, यावरही चर्चा होणार आहे.
शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या सातारा कराड कोअर कमेटीचे प्रमुख कर्नल महादेव काटेकर तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी केले आहे यावेळी माजी सैनिक संतोष यादव, रमेश जाधव उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड

टिप्पणी पोस्ट करा