श्री.मंदार वैद्य (काका)
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)
कुडाळ (जावली) : काटवली - ठाणे एसटी बस ला मिळालेल्या भरभरून प्रतिसादनंतर मेढा आगार, सातारा विभाग यांच्यावतीने रातराणी एक्सप्रेस तेही थेट गावावरून पाचवड ला जाऊन ट्रक, टँकर ने मुंबईला जाणाऱ्या प्रवासी वर्गाने आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये, आपल्या एसटी बस ला प्राधान्य द्या.
या बसमुळे करहर, कुडाळ, पाचवड तसेच जावली तालुक्यातील प्रवाशांना पाचगणी ते पाचवड विभागातील प्रवाशांना मुंबई ठाण्याकडे जाण्यासाठी सोईचे होणार आहे. या विभागातून ठाण्याकडे मुंबईकडे जाण्यासाठी एकही थेट बससेवा नव्हती. ती उपलब्ध करून दिल्याबाबत मेढा आगार, सातारा विभागाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या बससाठी ऑनलाईन आरक्षण देखील उपलब्ध करून देण्यात आले असून प्रवाशांना आगाऊ तिकिट काढण्याची सुविधा मिळणार आहे. ही बस काटवली येथे आल्यानंतर ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने वाहक, चालक यांचे स्वागत करून बसचे पूजन करण्यात आले. ही बससेवा सुरू केल्याबद्दल प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)



टिप्पणी पोस्ट करा