मुलाच्या लग्नात जपली सामाजिक बांधिलकी गावच्या सुशोभीकरण साठी दिली पंधरा हजार रोख रक्कम

श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / जावली


जावली : तालुक्यातील सावली गावचे सुपुत्र ग्रामसेवक दिलीप जुनघरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नादिवशी अनाठायी खर्च टाळून गाव शुशोभीकरण करण्यासाठी सरपंच विजय सपकाळ यांच्याकडे १५००० रुपये सुपूर्द केले. अशीही काही माणसे असतात ती बोलतात तशीच चालतात, त्याचप्रमाणे संपूर्ण आयुष्य गावगाडा हाकण्यात घालविणारे ग्रामसेवक ते ग्रामपंचायत अधिकारी असा ३२ वर्षे सेवा देत असलेले सावली गावचे सुपुत्र दिलीप लक्ष्मण जुनघरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात थेट अनावश्यक खर्चाला बगल देवून आपले आदर्श गाव असलेल्या सावली ता.जावळी गावच्या सुशोभिकरणाला तब्बल १५ हजार रक्कम रुपये रोख लग्नातच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सरपंच विजय सपकाळ यांच्याकडे दिली. 

इतकेच नाही तर लग्न अक्षदाही प्लॅस्टीक पिशवी ऐवजी सुंदर अश्या जरीच्या कापडामध्ये वाटप करून लग्नाचे पोशाख आणि सत्कार समारंभासाठी कापडी पिशव्या चा वापर करून लग्नातून प्लॅस्टीक बंदीचाही संदेश दिला. आपल्या कृतीतून नवसंदेश व इतरांपुढे आदर्श ठेवणारे ग्रामपंचायत अधिकारी दिलीप जुनघरे यांचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंसह अनेकांनी भरभरून कौतुक केले.

सावली ता.जावळी गावचे रहिवाशी असलेले दिलीप जुनघरे यांचे सुपुत्र सागर व सुधीर मोरेपाटील रा सातारा यांची सुकन्या सुप्रिया यांच्या विवाहाच्या निमित्ताने हा समाज्याला दिशा देणारा संस्कृती तून संस्कार देणारा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांच्यासह जिल्हयातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
लग्न म्हटले की प्लॅस्टीकच्या वस्तुंचा मोठा वापर त्यात वरात, डॉल्बी, फटाके याची मोठी रेलचेल असते अश्या वायफट खर्चाला बगल देत गावच्या विधायक कामाला वरपिता दिलीप जुनघरेनी ही मदत केली. आपल्या सावली गावांत असलेली प्लॅस्टीकला बंदी, फटाके वाजविण्यास बंदी तसेच डॉल्बी वाजविण्यास बंदी यांचेही त्यांनी तंतोतंत पालन करून गावांसह जिल्ह्यात एक वेगळा आदर्श घालून दिला.
    
जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त असलेले दिलीप जुनघरे यांचे ग्रामपंचायत म्हाते किकली आणि सध्या जांब येथे उल्लेखनिय काम असून जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे ते संचालक आहेत. त्यांनी सावली गावचे तब्बल १५ वर्षे गावसचिव म्हणून उल्लेखनिय काम करून आजही आपल्या सावली गावांत सक्रिय सहभाग घेवून सावली च्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देत आहेत.
 


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / जावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने