सातारा रहिमतपूर पोलीस स्टेशन चे एपीआय सचिन कांडगे साहेब यांनी ऐतिहासिक ईदगाह मध्ये पंचक्रोशीतील जमा झालेल्या मुस्लिम समाजाला दिल्या ईदच्या शुभेच्छा


रहिमतपूर (सातारा) : रहिमतपूर पोलीस स्टेशन चे एपीआय सचिन कांडगे साहेब ईदगाह मध्ये आले असताना आपले विचार मांडताना म्हणाले ये ईद तो दुसरो पे रहम करने को सिखाता है गरिबाला मदत हाच खरा धर्म आहे. कोणतीही अडचण आल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत. 


यावेळी त्यांनी लोकांना फुले देऊन त्यांच्या आनंदात खारीचा वाटा उचलला. ईदगाह मध्ये आलेल्या सर्व मुस्लिम समाजातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच त्यांच्याबरोबर रहिमतपूर चे शिवसेना नेते व नियोजन समितीचे सदस्य व माजी नगराध्यक्ष वासुदेव माने उर्फ काका व त्यांचे सहकारी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे सदस्य दरवर्षीप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. 


आदरणीय काका म्हणाले रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तयार राहणार रहिमतपूर हे गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे यावेळी मुफ्ती अजीम यांनी देशाच्या एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी दुवा केली नमाज पटनासाठी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते संपूर्ण शहरात पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी शीरखुर्मा चा आस्वाद घेतला बंधू भावाप्रमाणे एक दुसऱ्याला आलिंगन दिले.



न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / रहिमतपूर (सातारा)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने