नांदुरा गावातील संतप्त गावकऱ्यांनी घातला पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव

प्रतिनिधी : श्री.निलेश सुर्वे  


हिंगोली : जिल्ह्यातील नांदुरा येथे जल जीवन मिशन विहिरीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराला घेराव घालून धारेवर धरले. संतप्त महिलावर्ग व गावकऱ्यांच्या रोशाला अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला सामोरे जावे लागले आहे. 

अर्धा ते पाऊण तासांच्या रोशनानंतर कशीबशी आपली सुटका करून घेतली. शुक्रवारी दिनांक 3 ला सायंकाळी हा प्रकार घडलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात जल जीवन मिशनचे काम बोगस झालेले असून कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने हे काम चालू आहेत. जिल्ह्यातील नांदूरा या गावात जलजीवन चे काम मागील काही दिवसांमध्ये पूर्ण झालेले असून. या योजनेसाठीगावातील एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचे काम झालेले आहे. विहिरीला पाणीदेखील लागलेले आहे. या विहिरीहून गावाला काही दिवश पाणीपुरवठा देखील करण्यात आला. 

काही दिवसापूर्वी या शेतकऱ्याने या विहिरीचे पाणी आपल्या शेताला देणे चालू केलेली आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊन गावाला पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या दिवशी दुपार संतप्त महिलांनी पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंताच्या दालनात हांडे घेऊन ठिय्या मांडला होता. यानंतर संबंधितांनी याची चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर महिला माघारी परतल्या.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / हिंगोली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने