हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा खुर्द येथे कन्यारत्न जन्मताच वाद्याच्या गजरात वाजत गाजत गावभर वाटली जिलेबी

प्रतिनिधी : श्री.निलेश सुर्वे


हिंगोली : जिल्ह्यातील केंद्रा खुर्द तालुका सेनगाव छोटे गाव असलेले व या गावातील अमर संतोषराव जाधव व शीतल अमर जाधव यांना कन्यारत्न झाले. 



मुलगा वंशाचा दिवा व मुलगी परक्याची धन अशी दृढ परंपरा आजही समाजात आहे परंतु आम्हाला मुलगा व मुलगी यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता जाधव कुटुंबीयांनी वाद्याच्या गजरात वाजत गाजत गावभर जिलेबी वाटून आनंद व्यक्त केलेला आहे.



मुलीची आजी मीनाताई संतोषराव जाधव हो आजोबा संतोष राव माणिकराव जाधव यांनी पुढाकार घेऊन गावभर वाजत गाजत जिलेबी वाटली व मुलगा मुलगी असा भेदभाव करणाऱ्यांच्या मुस्कटात मारली. अशा उपक्रमाची सुरुवात जाधव कुटुंबियांनी करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. या गोष्टीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुलगा मुलगी एक समान असा संदेश त्यांनी समाजापुढे ठेवलेला आहे.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / हिंगोली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने