हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक ; वडूज येथे रमजान ईद (ईद उल फित्र ) उत्साहात साजरी !

श्री.लालासाहेब माने पाटील 
प्रतिनिधी : वडूज (सातारा)


वडूज : दि. ३१ वडूज येथे रमजान ईद ( ईद उल फित्र ) मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली. येथील मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमाअत मस्जिद मध्ये नमाज पठण करणेत आले. येथील मुल्ला मस्जीद अहले सुन्नत वल जमाअत मस्जीदचे मौलाना तोसीफ रजवी यांनी धार्मीक प्रवचन केले व त्यांनंतर नमाज पठण करून सर्वासाठी दुऑ मागणेत आली. यावेळी परिसरातील सर्व मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


दरम्यान महिनाभर उपास कर्त्यांसाठी इफ्तारचे दररोज जेवण चालू होते. तसेच सत्तावीस शब ( शबे कदर ) दिवशी सर्व समाज बांधवाना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याला लहान थोरांसह महिला मंडळाची लक्षणीय उपस्थिती होती. महिनाभर हापीज इर्शाद यांनी कुराण पठण करीत सर्वांच्या बरोबर तरबीहची नमाज अदा केली. दहा दिवस इत्तकाब मध्ये बसलेल्या मुलांचा व मौलानांचा सत्कार करणेत आला . यावेळी मौलाना तोसीब रजा म्हणाले सर्व मुस्लीम बांधवानी इस्लाम धर्माचे आचरण करावे व आपल्या लहान मुला - मुलींना मस्जीद मध्ये कुराण पठण व नमाज शिकण्यासाठी पाटवावे असे आवाहन केले.  

यावेळी अनेक हिंदू बांधवानी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले. दरम्यान ईदगाह मैदानावर सुद्धा मुस्लीम बांधवानी नमाज पठण केले.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / वडूज (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post