ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची विनाकारण बदनामी करणाऱ्या महिलेवर कडक कारवाई करा

श्री.लालासाहेब माने (पाटील)
प्रतिनिधी / खटाव (सातारा)


खटाव तालुका भाजपा महिला मोर्चाचं पोलिसांना निवेदन
 

खटाव (सातारा) : राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना सन 2017 ते 2019 या काळात सदर महिलेने केलेल्या तक्रारीतुन न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं असताना देखील मंत्री जयाभाऊ यांच्या वर ती महिला जाणून-बुजून विनाकारण चिखलफेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे. 


त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी अन्यथा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा महिला मोर्चा तालुका अध्यक्षा वृषाली रोमण व महिला पदाधिकाऱ्यांनी वडूज पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे दिला आहे.


मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे की "२०१६ साली, सदर महिला ही याविषयी त्याना ब्लॅकमेल करत होती. आणि तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस सुद्धा केली होती, परंतु त्यावेळी कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. 


असे असूनही जवळजवळ सहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने मंत्री गोरे यांची बदनामी करण्याचे काम सुरू केले आहे.
" एक दोन न्यूज चॅनलला या महिलेने मुलाखत देऊन तिने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना याबाबतीत निवेदने दिल्याचे सांगितले.

प्रशासनाकडे याबाबत तकार आली असल्यास प्रशासनाने त्याबद्दत काय निर्णय घेतला होता, हे सुद्धा जाहीर करावे, कारण मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिका-यांच्या बद्दल सुद्धा या महिलेने बदनामीचे काम सुरू केले आहे.

आम्ही माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे यांना खूप वर्षांपासून ओळखतो, परंतु त्यांच्याकडून अशी कोणतीच वागणूक आम्हाला मिळालेली नाही, ते आम्हाला बहिणीप्रमाणेच मानतात, प्रत्येक ठिकाणी महिलांना सन्मानाचीच वागणूक मिळत असते, असे असतानाही एका चांगल्या व्यक्तीची नाहक बदनामी होत असेल तर ते समाजानाठी खूपच घातक आहे.

सदर महिलेमुळे आमच्यासारख्या सामान्य महिलांच्या कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा धोका आहे, आम्हाला घरातून बाहेर पडणे ही अशक्य होईल असे वाटायला लागले आहे, या एका महिलेमुळे समाजातील सर्व महिलाच बदनाम आहेत, असा समज होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्व सामान्य घरातील महिला बदनाम होत आहेत.
आमची आपणास विनंती आहे की आपण या महिलेची सखोल चौकशी करावी. 

त्या महिलेने आज पर्यंत किती जणांना धोका दिला, ब्लॅकमेल केले याची सुद्धा माहिती घ्यावी, आणि हे प्रकरण सहा वर्षांनी पुन्हा एकदा उकरून काढून मंत्री महोदयांची बदनामी करण्याच्या पाठीमागे कोण कोण आहेत याचीही माहिती घेऊन या महिलेवर आणि तिला पाठिंबा देणाऱ्या किंवा तिला असे करण्यास प्रवृत्त करणा‌या सर्व घटकांवर कडक कारवाई करावी. 

असं ही या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी रेश्मा तानवडे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, स्वप्नांली गोडसे,राधिका गोडसे,मनीषा काळे, रेखा माळी, रोशना गोडसे,शोभा वायदंडे, शीतल गोडसे, किशोरी पाटील,सुरेखा पाटील,वैशाली माने,रेखा लोहार आदी महिला मोर्चा पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / खटाव (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post