बाविसगाव समाजाचे अध्यक्ष राम पवार यांचे दुःखद निधन.

श्री.सुनील धनावडे 
प्रतिनिधी / सातारा


सातारा : जावली तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या कोयना भाग या भागातील कोयना पूर्व विभाग सेवा संघ २२ गाव बामणोली विभाग या विभागाचे अध्यक्ष राम मारुती पवार यांचे दुःखद निधन झाले अंत्यविधी रविवारी दि.२३ रोजी सकाळी दहा वाजता पावशेवाडी या गावी होतील. राम पवार यांनी राजकारणामध्ये देखील झोकून देऊन काम करत कोयना भागामध्ये आमदार जी जी कदमांपासुन ते अगदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची संपूर्ण भागामध्ये ओळख आहे.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायत बामणोली मध्ये सदस्य उपसरपंच पदापासून ते बाविसगाव समाजाच्या सचिव पदापासून अध्यक्षापर्यंत मजल मारली शेवटपर्यंत ते मंत्री शिवेंद्रराजे यांच्याशी एकनिष्ठ राहिले त्यांचे अंत्यदर्शन मंत्री शिवेंद्रराजे यांनी प्रतिभा हॉस्पिटल या ठिकाणी घेतले असून अंत्यविधीला देखील ते स्वतः पावशेवाडी या त्यांच्या गावी उपस्थित राहणार आहेत.

राम पवार यांचे पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुलगे, भाऊ, बहिण असा परिवार आहे राम पवार यांच्या जाण्याने कोयना भाग १०५ गावांमध्ये सर्वत्र दुःख पसरले असून सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारा माणूस अशी ख्याती असणाऱ्या राम पवार यांच्या प्रति सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नुकताच त्यांच्या गावचा पारायण सोहळा पार पडला या पारायण सोहळ्यामध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेत शुक्रवारी पारायण सोहळ्याचा काला केला त्यानंतर त्यांना तेथूनच थेट रुग्णालयात आणण्यात आले रुग्णालयांमध्ये ते आल्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर होती त्यानंतर शनिवारी दुपारी त्यांनी प्रतिभा हॉस्पिटल सातारा येथील रुग्णालयांमध्ये अखेरचा श्वास घेतला.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post