कण्हेर धरण क्षेत्रातील वेण्णानदीवर बुडीत बंधारे बांधावेत, जावळीकरांची मंत्री शिवेंद्रबाबांकडे मागणी

प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे


मेढा (जावली) : कण्हेर धरणाच्या उभारणीमध्ये जावली तालुक्यातील अनेक गावे विस्थापित झाली असून तदनंतरही कण्हेर धरणातील पाण्याचा वापर जावलीकरांना कमी व इतर जिल्ह्यांना जास्त होत असल्याने व मार्च ते जुन महिन्यादरम्यान वेण्णा नदीपात्र रिटकवलीच्या वरच्या बाजुला कोरडे ठणठणीत होत असल्याने शेतीला सोडाच तर अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होत असल्याने जावली तालुक्यातील लोक शहराकडे स्थलांतरीत होत असल्याने लवकरात लवकर १ टि.एम.सी.चे बोंडारवाडी धरण व्हावे त्याच बरोबर नदिपात्रात चार-पाच बुडीत बंधारे व्हावेत अशी मागणी आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांना मेढा येथे निवेदनाद्वारे केली आहे.

    जावली तालुक्यातील अनेक गावे शेतीला पाणी नसल्याने,युवकांच्या हाताला काम नसल्याने आणि पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने आपले घरदार सोडून शहराकडे जात आहेत.चार महिने उसंत न घेता धो धो पडणार्‍या पाऊसाचे पाणी नदीला पूर येवून वहावून जाते आणि उन्हाळ्याचे चार महिने नदीपात्र कोरडे ठणठणीत होते अशी द्विधा अवस्था बघायला मिळते. ५४ गावांची शेती ओलीताखाली येण्यासाठी जशे १ टि.एम. सी.चे बोंडारवाडी धरण आवश्यक आहे त्याच पध्दतीने वहावून जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी नदीपात्रात रिटकवली,मेढा, करंजे,मामुर्डी,सावली या गावांच्या धरण क्षेत्रातील नदिपात्रात बुडीत बंधारे बांधले तरं नदिच्या दुतर्फा असणार्‍या अनेक गावांना या पाण्याचा उपयोग होईल. तसेच नदिपात्रातील गाळ काढून शेतकर्‍यांना दिल्यास गाळमुक्त धरण होवून पाण्याची अधिक साठवण होईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आम्ही जावळीकर चळवळीच्या माध्यमातून दिलेल्या या निवेदनावर विलासबाबा जवळ,पांडूरंग बापू जवळ,कांतीभाई देशमुख,दत्ताआण्णा पवार, विकास देशपांडे,आदिनाथ ओंबळे,राजेंद्र जाधव,हनुमंत शिंगटे,सुरेश दळवी,संतोष वारागडे, फारूख शेख, धनंजय खटावकर,सदाशिव जवळ इत्यादींनी सह्या केल्या आहेत.यावेळी मंत्री शिवेंद्रराजेंनी सकरात्मक प्रतिसाद देत यावर नक्कीच विचार करून पुढील कार्यवाही करू असे आश्वासित केले.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली) 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने