क्रीडा संकुल होण्यासाठी मेढा दक्षिण विभाग २१ गाव विचार मंचाचे मंत्री महोदय बाबाराजे यांचेकडे निवेदनाद्वारे साकडे

प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे

मेढा (जावली) : शूरवीरांचा जावली तालुका आणि या जावली तालुक्यात एखादे भव्य- दिव्य क्रीडा संकुल असावे असा उद्देश मनामध्ये ठेवून वेण्णा दक्षिण विभागातील छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले विचार मंच २१ गाव मार्फत मेढा येथे झालेल्या आढावा बैठकीत क्रीडा संकुलन तसेच वेण्णा नदीत ओझरे ते निझरे पूल होण्यासाठी मा.आ.श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले(बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य)यांचेकडे निवेदन देण्यात आले. 

शूरवीर-क्रीडा प्रेमींचा जावली तालुका आणि या जावली तालुक्यात सुसज्ज क्रीडा संकुलन झाले तर अनेक खेळांना भरपूर वाव मिळेल आणि तालुक्यातून अनेक खेळाडू तयार होतील ही संकल्पना मनामध्ये ठेवून तसेच क्रीडा संकुल नसल्याकारणाने जावली तालुक्यातील अनेक खेळाडू अनेक खेळांपासून वंचित राहिलेले दिसून येत आहेत. दक्षिण विभागातील मौजे काळोशी येथे शासकीय जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी रस्त्याची सोय तसेच लाईटची सोय उपलब्ध आहे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. 

जावली तालुक्यात क्रिकेट, खो-खो कबड्डी, रस्सीखेच, दांडपट्टा, कुस्ती अशा अनेक खेळांमध्ये खेळाडू तयार आहेत. अशी माहिती या निवेदनाद्वारे सुचवण्यात आली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले विचार मंच २१ गाव अध्यक्ष अंकुश शेलार,उद्योजक विजय शेलार, युवा नेते अविनाश कारंजकर तसेच धनकवडी, निझरे , काळोशी, मालचोंडी, करंडी,दुंद, कुसुंबी, गांजे, पिंपरी, मोहाट या गावातील सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आणि दक्षिण विभागाच्या विकासासाठी आपण कायमस्वरूपी एकरूप राहू असे मत व्यक्त केले अशी माहिती देण्यात आली.

न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post