जनता माध्यमिक विद्यालय करंदीचे शिक्षक श्री.श्रीकर रेळेकर यांना स्वराज्य फाउंडेशन यांच्यातर्फे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार व पाच विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान



कुडाळ (जावली) : स्वराज्य फाउंडेशन यांच्यातर्फे जनता माध्यमिक विद्यालय चे शिक्षक आणि विद्यार्थी यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी मा.श्री नितीन तारळकर साहेब, मुंबईच्या शिक्षणाधिकारी मा.सौ अरुणा यादव मॅडम, सातारा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री धनंजय चोपडे साहेब तसेच प्रतापगड सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा जावली तालुका पंचायत समितीचे उपसभापती मा.श्री सौरभ (बाबा) शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 


शिक्षक श्री श्रीकर रेळेकर सर यांना स्वराज्य फाउंडेशन यांच्यातर्फे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार व अंकिता निकम, अनुष्का निकम, श्रावणी निकम, शर्या निकम, तन्वी गंगावणे या पाच विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सातारा जिल्ह्याचे क्रीडा समन्वयक तसेच जनता सहाय्यक मंडळाचे सचिव आणि मार्गदर्शक मा.श्री शिवाजी निकम यांचाही सत्कार करण्यात आला. 

करंदी गावचे भूषण व शाळेचे पालक तथा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, अमेरिकेतील बोस्टन मॅरेथॉन चे भारताचे प्रतिनिधित्व करणारे मा.श्री सचिन निकम यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला पुरस्कार प्रदान शिक्षक व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी जनता माध्यमिक विद्यालय करंदी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य श्री आदर्श जनता शैक्षणिक व वैद्यकीय संस्था (करंदी) मुंबई (रजि) अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ करंदी व रानगेघर ग्रामस्थ



न्यूज मराठी लाईव्ह 
कुडाळ / जावली

Post a Comment

Previous Post Next Post