जावली तालुक्यातील गांजे गावची गिरीशा देशमुख हिची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड

बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील) 


सातारा (जावली) : तालुक्यातील गांजे गावचे खंबीर नेतृत्व श्री.सुनील(नाना) देशमुख यांची कन्या कु.गिरीशा हिने नुकत्याच झालेल्या एम.पी.एस.सी. परीक्षेत सुयश संपादन केले असून तिची महसूल सहाय्यक अधिकारी पदी नुकतीच निवड झाली आहे. ती रयत शिक्षण संस्थेचे श्री विठ्ठलराव देशमुख विद्यालय पंचक्रोशी गांजे या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून कोणताही क्लास न लावता जिद्द चिकाटी व आत्मविश्वास यांच्या बळावर स्वतः अभ्यास करून एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन करून यशाचा अध्याय निर्माण केल्या बद्दल, अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष आणि न्युज मराठी लाईव्ह चे संपादक श्री.अनिल करंदकर यांच्या कडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा. कुमारी गिरीशा हिचे संपूर्ण जावली तालुक्यातून अभिनंदन होत आहे. मेहनत तर सगळे करतात, पण यश त्यांनांच मिळत जे कठीण मेहनत करुन शेवट पर्यंत हार मानत नाहीत, गिरीशाच्या जिद्दीला प्रयत्नाला यश मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन..!

न्यूज मराठी लाईव्ह 
गांजे (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post