डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, जिल्हा सातारा संलग्न जावली तालुका अध्यक्षपदी सुनिल आण्णा धनावडे यांची निवड

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी 


मेढा (जावली) : डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र, जिल्हा सातारा संलग्न जावली तालुका अध्यक्षपदी सुनिलअण्णा धनावडे व कार्याध्यक्षपदी देवेंद्र साळुंखे, उपाध्यक्षपदी राहुल ननावरे तर सचिवपदी शेखर जाधव यांची बिनविरोध निवड झाली. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या निर्देशानुसार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना जावली तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच मेढा येथे पार पडली. यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज धुमाळ व जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे व जावली डिजिटल संघटनेचे मावळते अध्यक्ष भास्कर धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होती.

या बैठकीमध्ये जावली तालुका अध्यक्षपदी सुनिलअण्णा धनावडे, कार्यअध्यक्षपदी देवेंद्र साळुंखे, उपाअध्यक्ष राहुल ननावरे, सचिव शेखर जाधव, खजिनदार विश्वनाथ डिगे, प्रसिद्धीप्रमुख प्रसन्ना पवार, संघटक बजरंग चौधरी, सहसचिव ओमकार साखरे, सहखजिनदार संजय वांगडे, संपर्कप्रमुख जितीन वेंदे यांची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करणेत आली. संघटनेचे माजी अध्यक्ष भास्कर धनावडे यांनी नुतन अध्यक्ष सुनिल धनावडे यांच्याकडे कार्यभार सोपवला, तसेच नुतन अध्यक्ष सुनिल धनावडे यांचा सत्कार करण्यात आला. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, जिल्हा साताराचे अध्यक्ष संतोष शिराळे, संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज धुमाळ व जिल्हा उपाध्यक्ष संदीप माने यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. युवराज धुमाळ, सोमनाथ साखरे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष सुनिल धनावडे म्हणाले, सर्वांना सोबत घेवून काम करणार, आपली संघटना वाढवणेसाठी प्रयत्न करून वेगवेगळे उपक्रम राबणार आहे. आपण सर्वानुमते दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
देवेंद्र साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर शेखर जाधव यांनी आभार मानले.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने