प्रतिनिधी : निलेश सुर्वे
हिंगोली : जिल्ह्यातील केंद्रा खुर्द या परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे. नीलगाई, रानडुक्कर, वानरे, हरीण यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वनविभागाला माहिती देऊनही वन विभाग सुस्त झोपेत आहे. वनविभाग कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही.
वनविभागाशी संपर्क केला असता नुकसान भरपाई साठी अर्ज करा असे उत्तर मिळते. नुकसान भरपाई साठी अर्ज जरी केला तर 1800 ते 2000 पर्यंत भरपाई मिळते. अर्ज करण्यासाठी सर्व खर्च 500ते 600 रुपये येतो. नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्याची थट्टा केल्यासारखी आहे.
एकर भर पिकाचे नुकसान झाले तरी तेव्हडीच रक्कम, जास्त झाले तरी सारखीच रक्कम देऊन शासन शिखराची थट्टा मस्करी करत आहे. या मुळे शेतकरी पुरता उध्वस्त होत चाललेला आहे.
अगोदरच शेतमालाला भाव नाही व वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यासाठी गंभीर प्रश्न बनलेला आहे. वन विभागाने वन्य प्राण्याचा कायमचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्याला जास्तीत जास्त वाढीव मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागलेली आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / हिंगोली



Post a Comment