वडूज : खटाव येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कातरखटाव ,तडवळे येथे भर दिवसा चोरी करून सुमारे नऊ तोळे सोन्याची दागिने व रोख रक्कम अशी लंपास केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या टीमने अतिशय खडतर प्रयत्नातून कोणतेही धागेद्वारे नसताना या चोरीचा उलगडा केला आहे. सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे कातरखटाव येथे रमेश बागल यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी उघडून घरातील सहा तोळे सोने व रोख रक्कम तसेच तडवळे तालुका खटाव येथील नवनाथ ढोले यांच्या बंद घराचा कोंयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याविरुद्ध वडूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्याबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करून तेथील परिसरातील बारकाईने पाहणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासात सुरुवात केली असता कराड सूर्यवंशी मळा येथील इब्राहिम अब्बास अली शेख वय 25 याने चोरी केल्याचे मान्य केले यावेळी इब्राहिम अब्बास अली शेख यावर तीन दिवस साध्या वर्षात पोलिसांनी नजर ठेवली व तो आपल्या मूळ गावी कर्नाटक मध्ये जात असताना कराड येथील कार्वे नाक्यावर पाठलाग करून पोलिसांनी त्याच ताब्यात घेतली
यापूर्वी सदर आरोपीविरुद्ध कराड तालुका उंब्रज ढेबेवाडी पोलीस स्टेशन तसेच कासेगाव विटा चिंचणी वांगी जिल्हा सांगली व कोडोली जिल्हा कोल्हापूर येथे एकूण सात घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / वडूज (खटाव)

टिप्पणी पोस्ट करा