बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
जावली : आलेवाडी ता.जावली येथे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा जल संवर्धनासाठी युवक हे ब्रीदवाक्य घेऊन विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न होत आहे. आज शिबिराचा उद्घाटन सोहळा मा.गट विकास अधिकारी जावली डॉ.निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मण्डल कृषी अधिकारी मा. संजय घोरपडे, डॉ . प्रमोद घाटगे, दैनिक ग्रामोद्धरचे पत्रकार श्री.नारायण शिंगटे यांची प्रमूख उपस्थीती होती. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी होते.या शिबिरामध्ये महाविद्यालयातील १०० विध्यार्थी सहभागी
झाले आहेत.
आलेवाडी गावाने नाम फाऊंडेशन यांच्या सहयोगाने हाती घेतलेल्या जलसंधारण उपक्रमात हातभार देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन ग्रामास्थ आणि महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विध्यार्थी यांच्या सहयोगाने दि .२१/०१/२०२५ ते २७/०१/२०२५ या कालावधीत जलसंधारण कामावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे
महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी सांगीतले.हे शिबीर यशस्वी करून जावली तालुक्यातील एक जलसमृध्द गाव म्हणुन आलेवाडी गावाने आपली ओळख निर्माण करावी असे अवाहन डॉ.निलेश पाटील यांनी याप्रसंगी केले. प्रास्ताविक एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे यांनी केले सुत्रसंचालन प्रा. सौ धनश्री देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. विनोद पवार यांनी केले.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment