तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी प्रतापसिंह नगर येथे संपन्न

प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे

सातारा : प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्र माहुली अंतर्गत उपकेंद्र खेड अंतर्गत मौजे प्रतापसिंह नगर येथे हंड्रेड डेज आणि तेजस्विनी अभियानामध्ये तीस वर्षावरील स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली या ठिकाणी मेडिकल कॉलेज सातारा सिविल हॉस्पिटल येथील DEAN Saheb डॉ. रवींद्रनाथ चव्हाण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेडिकल कॉलेजची आणि आरोग्य केंद्र क्षेत्र माऊली येथील टीम यांनी मिळून 130 पेशंटची( हंड्रेड डेज आणि तेजस्विनी अभियान यातील) आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार देण्यात आला आणि काही रुग्णांना संदर्भ सेवेसाठी पुढे पाठविण्यात आले

या कार्यक्रमामध्ये डॉ. रवींद्र चव्हाण डॉ.आनंदराव पाटील श्री व्ही बी माळवदे आरोग्य सहाय्यक, सी एच ओ रोहिणी पगारे,आरोग्य सेविका रेश्मा जाधव, शफिक शेख, अपर्णा कांबळे, ऋतुजा कदम, व सर्व आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले याबद्दल डॉ.रवींद्र चव्हाण आणि डॉ.आनंदराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले.अशी माहिती मिळाली.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / जावली (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post