मैत्री रन टी शर्ट अनावरण कार्यक्रम वडूज येथे संपन्न ! रविवार दि.१ रोजी भव्य मॅरेथान स्पर्धा

प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील)

वडूज : येथील यशंवत सभागृहात मैत्री कला , क्रिडा व सांस्कृतीक मंडळाच्या वतीने ' मैत्री रन - २०२४ ' मॅरेथॉन स्पर्धेच्या टी शर्ट अनावरण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष नरेंद्र गोडसे , डॉ. अजित इनामदार , पृथ्वीराज गोडसे, डॉ . सुधीर पवार, डॉ.दयानंद घाडगे, प्रशांत सरनोबत, सुरज कचरे , यांची प्रमुख उपस्थिती होती .
डॉ. महेश काटकर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले कि , वडूज शहराला ऐतिहासीक वारसा असून येथील विविध सामाजीक संस्था , आरोग्य , पर्यावरण आणि स्वच्छता याबाबत नेहमीच सतर्क असतात. शहर व परिसरातील लोकांचे राहणीमान व आरोग्यदायी व्यायाम यासाठी विविध संकल्पना द्वारे समाजहित जोपासले गेले आहे . चालणे, धावणे आणि सायकलींग या व्यायाम प्रकारा मुळे जीवन शैलीत बराच फरक पडतो असेही डॉ. काटकर म्हणाले. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, डाँ .सुधिर पवार , डाँ.शंतनू पवार,डाँ . दयानंद घाडगे, धावपटू जयंत शिवदे ,सुरज कचरे,प्रशांत सरनोबत आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली.
उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचलन अँड. अनिल गोडसे यांनी तर आभार राजकिरण लंगडे यांनी मानले.या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक , सहप्रायोजक , नगरसेवक अभयकुमार देशमुख, जयवंत गोडसे, डॉ. प्रविण चव्हाण , डाँ .चंद्रशेखर नांगरे , डॉ. धनंजय खाडे , डॉ. कुंडलीक मांडवे ,श्रीनिवास कदम , डाँ . हनुमंत मासाळ, अमित दळवी,डाँ. कोळेकर,संतोष कुलकर्णी , डॉ. प्राजक्ता काटकर , सदाशिव बागल, शीतल गोडसे, सरिता घार्गे,डॉ. निता इनामदार , मनोज राऊत, संतोष शहा आदिंसह मैत्री कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते .
रविवार दि. १ डिसेंबर रोजी मैत्री रन - २०२४ वडूज येथे रविवार दि. १ डिसेंबर रोजी महिला व पुरुष यांचेसाठी १० व ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे . आकर्षक बक्षिसांसह टी शर्ट, मेडल , बीआयबी , अल्पोपहार , सर्टिफिकेट मिळणार आहे. तरी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले .

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / वडूज (सातारा)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने