वरूड गाव सातारा जिल्ह्यातलं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातलं आदर्श गाव म्हणून एक रोल मॉडेल ओळखले जाईल

प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील) 


वरूड : ता.खटाव जि.सातारा येथे मियावाकी जंगल व वरुड मधील झालेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी मा. याशनी नागराजन IAS, ( मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सातारा) मा. अर्चना वाघमळे (उप.मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत) मा. जस्मिन शेख (गटविकास अधिकारी,खटाव) मा. माधव तमन भुईनवाड ( विस्तार अधिकारी ) यांनी भेट दिली. 


यावेळी CEO मा. याशनी नागराजन यांनी मियावाकी जंगल, फ्रूट फॉरेस्ट, डिप सी सी टी,वरूड तलाव अशा विविध कामांची पाहणी केली. वरूड गावात झालेले काम पाहून वरूड सातारा जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गाव म्हणून एक रोल मॉडेल ओळखले जाईल. वरुड मध्ये पर्यावरण, जलसंधारण, ऍग्रो फॉरेस्ट्री , अशा अनेक उपक्रमांवर काम चालू असल्याने त्या कामाचे कौतुक करत सर्व ग्रामपंचायत व सर्व टीमचे कौतुक केले.



यावेळी वरुड गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, ग्रामस्थ वरूड व सेट्रीज टीम उपस्थित होती. यावेळी वरूड मध्ये या मियावाकी जंगल परिसरात बसून वनभोजनाचा आस्वाद घेत अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा केली.


मा. याशनी नागराजन यांनी यावेळी सेट्रिज संस्थेचे महाराष्ट्रात चालू असलेल्या कामांची संपूर्ण माहिती घेतली. Agroforestry प्रकल्पाची माहिती घेऊन कार्बन क्रेडिट वर होत असलेले कामाची माहिती घेतल्यावर आपल्याला सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक जागा व शेतकऱ्यांच्या जागेवर कार्बन क्रेडिट चे प्रकल्प वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.  
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / वरुड (सातारा)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने