वरूड सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त ! बाळासाहेब भोसले यांची प्रशासक म्हणून झाली नियुक्ती

वरूड सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त ! बाळासाहेब भोसले यांची प्रशासक म्हणून झाली नियुक्ती

प्रतिनिधी- लालासाहेब माने (पाटील)

वरुड (ता. खटाव) : येथील विकास सेवा सोसायटीचे लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त झाले असून सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब भोसले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन भरत निवृती जगदाळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी दहा संचालकांनी अविश्वास ठराव आणला होता.

चेअरमन जगदाळे हे सहकारी संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. त्यांच्या मनमानीमुळे संस्था अडचणीत येण्याची शक्यता असल्या कारणाने त्यांच्यावर सर्वानुमते अविश्वास ठराव आणण्याचा निर्धार करण्यात आला होता.

निवेदनावर व्हाइस चेअरमन सुभाषराव काटकर, संचालक शशिकांत जाधव, लालासाहेब माने, सुरेश सूर्यवंशी विष्णुपंत वाघमारे, हणमंतराव साळुंखे, तुषार इनामदार, भीमराव माळी, वनिता जगदाळे, सुवर्णा निंबाळकर आदींच्या सह्या आहेत. हा अविश्वास ठराव तडीस जाणार हे चेअरमन जगदाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन महिला संचालक यांना आपल्या बाजूने केले असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून येताच संचालक सुभाषराव काटकर, शशिकांत जाधव, लालासाहेब माने, सुरेश सूर्यवंशी, विष्णुपंत वाघमारे, हनुमंतराव साळुंखे, तुषार इनामदार, भीमराव माळी यांनी आपले राजीनामे सहाय्यक निबंधक दाजी खताळ व सोसायटी सचिव वैभव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले या राजीनाम्यावर सुनावणीहोऊन संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून भोसले यांच्याकडे प्रशासक म्हणून कार्यभार सोपवला आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / वडुज (सातारा)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने