" एकच भाऊ जया भाऊ " घोषणाबाजी औंध मध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

प्रतिनिधी : श्री.महेश यादव


औंध / सातारा दि.२३ : खटाव माण मधून आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अवघ्या खटाव माणचे लक्ष लागून राहिले होते की कोण निवडून येणार ? आज सकाळपासूनच मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर उमेदवाराबरोबरच जनतेलाही निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांना मताधिक्य मिळून ते विजयी झाले यानंतर कार्यकर्त्यांनी औंध येथे जल्लोष केला व येथील हायस्कूल चौकापासून भव्य मिरवणुकीस सुरुवात केली गुलालाची उधळण करत ,फटाक्यांची आतिषबाजी व डॉल्बीच्या दणदणाट सुरावर ठेकात धरत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. 
हा जल्लोष इतका मोठा होता की संपूर्ण गाव गुलालात नाहून निघाले साऊंड सिस्टीम ने औंध दणाणून गेले या मिरवणुकीत तिनीही गोरे बंधूंना कार्यकर्त्यांसह समर्थकांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी कार्यकर्ते धनाजी आमले, मेजर वसंत पवार,गणेश चव्हाण, सावता यादव, गणेश यादव, मंगेश इंगळे, संदीप गुरव ,प्रशांत कुंभार, मंदार कुंभार, संतोष भोसले यांसह मान्यवरांसह कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / औंध (खटाव)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने