जनता माध्यमिक विद्यालय करंदी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा ! कु.अनुष्का निकम राज्यात चौथी !

श्री.अनिल करंदकर (पाटील)


जावली : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित जनता माध्यमिक विद्यालय करंदी तालुका जावली इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु अनुष्का सचिन निकम या विद्यार्थिनींने डेरवन येथे झालेल्या *राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत 400 मीटर हर्डल्स* या क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले.


1 मिनिट 9 सेकंद इतक्या कमी वेळात तिने स्पर्धेत आपले स्थान पटकावले.

वयाने कमी असून ही अनुष्काने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे यश संपादन केले 
जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
 करंदीच्या या सुवर्ण कन्येचे मैदानभरून अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक आणि क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढोक सर, सौ. ढोक मॅडम मार्गदर्शक शिक्षक श्री रेळेकर सर व कामटे सर यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे
पुन्हा एकदा सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयामार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन

शुभेच्छुक - श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष, सचिवा व सर्व सदस्य, मा शिक्षणाधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा मा.जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा  पंचायत समिती, जावलीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, जनता माध्यमिक विद्यालय करंदीचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच श्री आदर्श जनता शैक्षणिक व वैद्यकीय शिक्षण संस्था करंदी (मुंबई) रजि चे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ,  माता पालक संघ,  करंदी पंचक्रोशीतील सर्व सहकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत करंदी व रानगेघर आणि ग्रामस्थ.





न्यूज मराठी लाईव्ह 
करंदी / जावली (सातारा) 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने