प्रतिनिधी : लालासाहेब माने (पाटील)
खटाव : औंधसह २१ गावांना पाणी देण्याचे काम फक्त आमदार जयकुमार गोरे हेच करु शकतात. २१ गावांच्या पाणी देण्याबाबतची मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे. जयाभाऊ दिलेला शब्द पूर्ण करणारे नेते आहेत, बाकी कुणाच्यात तशी धमक नसल्याने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह डॉ. विवेक देशमुख यांनी केला पक्षप्रवेश
दिनांक ०७-नोव्हेंबर रोजी आ.जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी डॉ. विवेक देशमुख मा. प. स. सदस्य, मनोहर देशमुख मा. उपसरपंच, कल्याण देशमुख सदस्य विकास सेवा सोसायटी, पृथ्वीराज देशमुख, स्वप्निल देशमुख, संग्राम देशमुख, सागर देशमुख, विजय लवंगरे, अक्षय प्रकाशराव देशमुख, अक्षय देशमुख, अक्षय भोईटे, संजय गाढवे श्यामराव देशमुख, व अनेक जणांनी भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला.
या जाहीर पक्षप्रवेश प्रसंगी हनुमंत हिरवे मा. प. सदस्य, शहाजी देशमुख मा. सरपंच, भरत जाधव मा. प. स. सदस्य, निलेश जाधव, संतोष भंडारे मा. सरपंच, हरिभाऊ बनसोडे, अमरजीत देशमुख मा. उपसरपंच, कांतीलाल देशमुख, रमेश देशमुख सदस्य विकास सेवा सोसायटी, सुजित ननावरे, विठ्ठल देशमुख, मंगेश शिंदे, केतन देशमुख यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. आ. जयकुमार गोरे भाऊ यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खटाव (सातारा)

