वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) मेढा यांची कारवाई ! पिकअप वाहन जप्त

बातमी : श्री.विलास दरेकर (संपादक)


मेढा (जावली) : दि. 20/10/2024 रोजी वनाधिकारी यांना मिळालेल्या बातमीवरून मेढा कुडाळ रस्त्यावर मेढा गावामध्ये विनापरवाना वृक्षतोड करून व विना पास परवाना खैर प्रजातीच्या जळावू लाकूड मालाची वाहतूक करीत असताना पिकअप वाहन क्र. MH-11-BL-4520 जप्त करून चालक निलेश उत्तम पवार वय 32 वर्षे रा. कुडाळ तालुका जावळी जिल्हा सातारा २) भरत बबन चव्हाण वय वर्ष 32 राहणार आकले ता. जि. सातारा लाकूड व्यापारी यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2) ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वनपरिक्षेत्र मेढा तालुका जावळी या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मेढा कुडाळ मेढा गावामध्ये खैर प्रजातीचा विनापरवाना वाहतूक करीत असताना वन विभागाने कारवाई केली सदर पिकअप खैर प्रजातीच्या मालासह जप्त करून पुढील तपास कामी वनपरिक्षेत्र कार्यालय मेढा कार्यालयाच्या आवारात सदर वाहन चौकशी कामे आणले आहे. या कामी वनरक्षक मेढा यांनी प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमांक दि. 20-10-2024 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक सातारा श्रीमती आदिती भार‌द्वाज मॅडम व मा. सहा. वनसंरक्षक वनीकरण सातारा श्री. प्रदीप रौंदळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली . श्री. जी.यु.महांगडे वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा अति.कार्यभार श्री. निलेश नि. रजपूत वनपाल बामणोली अतिरिक्त कार्यभार व श्री एस डी चौगुले वनपाल मेढा अतिरिक्त कार्यभार श्री. राहुल धुमाळ वनरक्षक श्री. समाधान वाघमोडे वनरक्षक श्री. आकाश कोळी वनरक्षक श्री. विनायक लांडगे वनरक्षक श्री. नेताजी वासुदेव व कर्मचारी वर्ग यांनी केली.

न्युज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने