विद्यमान आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अधिकृत उमेदवारी भाजपकडून जाहीर होताच कार्यकर्त्यांमधे उत्साहाचे वातावरण

प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य


कुडाळ (जावली) : श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज भाजप कार्यकारणी कडून विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करणेत आली. या यादी मधे काही विद्यमान आमदार व काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांनासंधी  देण्याचा आली आहे
छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सातारा जावली विधान सभेसाठी अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांमधे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अजूनही महाविकास आघाडी व महायुतीतील घटकपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची यादी प्रसिद्ध होण्या आधीच भाजपने धक्कातंत्र वापरत आपली ९९ उमेदवारांची यादी घोषित केली तर आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बहूसंख्य मंतांनी निवडून आणण्या करीता प्रत्येक गावागावा मधे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामधे सोशल मिडीया व्हॉट्स ॲप ग्रुप पोल एजंट, गाव प्रभाग यांवर कार्यकर्त्यांनी एकत्र संघटन करून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणण्याचा निर्धार जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने