प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील)
वडुज : आनंदकुमार उर्फ आप्पासाहेब यादव यांची विभागीय कार्यालय सातारा येथे सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदी बढती.
१९९४ पासून २०२४ पर्यंत बत्तीस वर्षापेक्षा जास्त रा.प. वडुज आगारा मध्ये त्यांनी चालक म्हणून उत्तम सेवा केली .
या सेवा काळात त्यांनी केंद्रीय प्रशिक्षण वर्गात प्रथम क्रमांक, विना अपघात सेवा पुरस्कार, उत्कृष्ट कामाबद्दल महाराष्ट्र प्रशस्तीपत्र, व्यसनमुक्त युवक संघटना, दलित महासंघ सत्कार, जिल्हा पोलीस प्रमुख माधवराव सानप यांच्या हस्ते तसेच अपंग कुटुंबातील मुलांना शालेय वस्तू वाटप करून एक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवले आहेत.तसेच कार्य बजावत असताना माणुसकी जपत गोंदवले येथील दोन दांपत्याची गाडीचा अपघात झालेला असता त्यांना मदत करून जीवदान दिले. तसेच गोंदवले बु.तीर्थक्षेत्र येथे भरधाव वेगाने एक मादक पदार्थाचा नशा करून ट्रेलर चालकाने यादव यांचा वडूज पंढरपूर s.t.ला मागून धडक देऊन ट्रेलर गोंधवले दिशेने पळवला ,ट्रेलर चालक नशेत असल्याचे पाहून यादव यांनी गोंदवले येथे येऊन धोकादायक ट्रेलर बाबत ग्रामस्थांना माहिती देऊन बाजुस होण्यास सांगितले तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रेलर थांबवण्याचा प्रयत्न केला.पण ट्रेलर थांबला नाही म्हणून पुढे दहिवडी पोलिस स्टेशनला यादव यांनी अवगत केले त्यामुळे संभाव्य जीवित हानीचा खूप मोठा धोका टळला. त्यामुळे कर्तव्यनिष्ठ s.t. चालक श्री.आनंदकुमार यादव यांचा गोंदवले बु.ग्रामपंचायती मार्फत १५/८/२०१७ रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी यथोचित सत्कार करून त्यांचा ग्रामसभेत अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आलेला आहे.
या कार्याबद्धल त्यांचे महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ सातारा विभाग यांचेकडून आणि अनेक मोठ्या मान्यवरांचा हस्ते सन्मान व रोख बक्षीस तसेच वेगवेगळे पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
सेवा कालात त्यांनी बेकायदेशीर प्रवाशी वाहतूकीला आळा घालणे, वडुज-दहीवडी,वडूज-मायणी शटल सेवा, कान्हरवाडी मुक्कामी एस. टी., वडूज-पुणे, वडूज जोतिबा, वडूज - सुपर सातारा, पंढरपूर वारी, पुसेगांव सेवागिरी यात्रा बाजार गाड्या असे अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत.
S.T.ची सेवा करत असतानाच वडुज परिसर तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, एस. टी. कामगारांच्या प्रश्नांसाठी चळवळ, अशा विविध कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. नेहमी S.T.कामकाज वाढण्या बरोबरच जनमानसात S.T.ची प्रतिमा उंचावण्यासाठी यादव यांची धडपड असते.
आप्पासाहेब यादव यांनी केलेल्या कार्यांचे जिल्हाभर कौतुक होत असते,त्याच बरोबर लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून ते नेहमीच S.T.ची प्रतीमा जनमानसांत उंचावण्याचा प्रयत्न करतात. वडूज आगारात त्यांची चांगलीं कामगिरी असल्याने त्यांना सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदी बढती मिळालेली आहे तसेच ते सातारा विभागात रुजू झालेले आहेत.
त्यांना सहाय्यक वाहतूक निरीक्षक पद मिळून बढती झाल्याने सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / वडूज (सातारा)
