सहाय्यक निबंधक दाजी खताळ यांच्याकडे सामुदायिक राजीनामा सुपुर्द करताना वरुड सोसायटीचे संचालक मंडळ

प्रतिनिधी : लालासाहेब माने (पाटील)


वडूज : वरुड (ता.खटाव) येथील वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन भरत निवृत्ती जगदाळे यांच्यावर काहि दिवसा पूर्वी दहा संचालकांनी अविश्वास ठराव आणला होता. याबाबत तहसिलदार खटाव, सहाय्यक निबंधक वडूज यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. चेअरमन जगदाळे हे सहकारी संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. त्यांच्या मनमानीमुळे संस्था अडचणीत येण्याची शक्यता असल्या कारणाने त्यांच्यावर सर्वानुमते अविश्वास ठराव आणण्याचा निर्धार करण्यात आला होता. 

या निवेदनावर व्हा. चेअरमन सुभाषराव काटकर, संचालक शशिकांत जाधव, लालासाहेब माने, सुरेश सुर्यवंशी, विष्णुपंत वाघमारे, हणमंतराव साळुंखे, तुषार इनामदार, भिमराव माळी, वनिता जगदाळे, सुवर्णा निंबाळकर आदिंच्या सह्या आहेत. दरम्यान सोसायटी चेअरमनवर अविश्वास ठराव येण्याची ही खटाव तालुक्यातील पहिलीच तर जिल्ह्यातील दुसरी घटना असल्याची चर्चा परिसरात आहे. 


हा अविश्वास ठरात तडीस जाणार हे चेअरमन जगदाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन महिला संचालक यांना दबाव पध्दतीने हाताळुन आपल्या बाजूने केले असल्याची चर्चा ग्रामस्था मधुन येताच संचालक सुभाषराव काटकर, शशिकांत जाधव, लालासाहेब माने, सुरेश सूर्यवंशी, विष्णुपंत वाघमारे, हनुमंतराव साळुंखे, तुषार इनामदार ,भीमराव माळी,या आठ संचालक यांनी आपले राजीनामे नोटरी पद्धतीने सहाय्यक निबंधक दाजी खताळ व सोसायटी सचिव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले ही राजीनामे मंजूर झाले तर सोसायटी अल्पमतात येऊन बरखास्त होती की अबाधित राहते याकडे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर अन्य काही गावातही असे प्रकार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / वडूज (सातारा)


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने