राजेंद्र विद्यालय-भाग शाळा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड


खंडाळा : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा व सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय मल्लखांब स्पर्धेत राजेंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय भाग शाळा बावडा(ता. खंडाळा) विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान कामगिरी केली.
यामध्ये लहान गट सार्थक पवार(मुले)-द्वितीय,समीक्षा पवार(मुली) -चतुर्थ,मोठा गट अथर्व भिसे-चतुर्थ,शितलकुमार पवार(मुले)-तृतीय या सर्वांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना मार्गदर्शन करणारे याबद्दल क्रीडा शिक्षक व्ही एन गाढवे, धर्माधिकारी,प्रशिक्षक गणेश पवार यांचे खंडाळा विभाग शिक्षण समिती अध्यक्ष शंकरराव गाढवे,सचिव संजीव गाढवे, प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्य अरुंधती गाढवे,ग्रंथपाल हणमंत यादव, पर्यवेक्षक सर्व शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / खंडाळा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने