मतदार जनजागृती निबंध स्पर्धा-२०२४

प्रतिनिधी / अमिर इनामदार

          
खंडाळा : लोकशाही मजबुतीसाठी भारतीय संविधानाने 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला मतदानाचा अधिकार बहाल केला आहे,नुकतीच भारतीय संविधान व प्रजासत्ताक भारताची 74 वर्षे पूर्ण झाली आहेत, स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यानंतर भारतीय विकास उभारणीत युवा मतदारांचे विशेष महत्त्व आहे.या अनुषंगाने युवा अभिव्यक्तीला लेखणीतून प्रेरणा मिळावी यासाठी राज्यशास्त्र विभाग व वाणिज्य व व्यवस्थापन विभाग,सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय,खंडाळा सातारा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व शाखा वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाईने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. हणमंत जाधव यांनी केले आहे.
निबंध स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे-
१.मतदार लोकशाहीचा हक्कदार,
२.मतदान-राष्ट्रीय एकतेचा निरपेक्ष मार्ग 
३.मी मतदान करणारचं...!
४.मत विकणार नाही...!
५.सक्षम लोकशाहीचे प्रभावी माध्यम-मतदान
निबंध साठी शब्द मर्यादा ७००-८०० असून 
प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी प्रमाणपत्रसह ₹.२५००,१५००,१००० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना ₹.५०० रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत.



स्पर्धकांनी आपले लिखित निबंध ०४ नोव्हेंबर २०२४ अखेर rmkhandala@yahoo.in ईमेल वर pdf स्वरूपात पाठवावेत. माहितीसाठी स्पर्धा समन्वयक प्रा.अमीर इनामदार-9834673418 यांना दु. 02 ते 05 वेळेत संपर्क करावा.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / खंडाळा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने