प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य
सोनगाव (जावली) : आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या साठी आपले दैवत आमदार माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना प्रचंड मतांनी निवडुन देण्यासाठी सोनगाव येथे जावली तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मा.नारायण आप्पा पाटील व अनिकेत निगडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोनगाव विकास सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन श्री रामदास शिंदे व प्रसाद मारुती निगडे (संचालक) विजय दिनकर मोरे ( संचालक) दत्तात्रयशंकर पालकर (संचालक) व विश्वास निगडे ( माजी उपसरपंच सोनगाव ) अरुण शिंदे (माजी ग्रामपंचायत सदस्य सोनगाव)
ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण चिकणे व सुनील रामचंद्र सोनवणे , दीपक शंकर शिंदे विश्वनाथ शिंदे व काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सोनगाव मधुन सर्वाधिक मतदान मिळवुन देण्यासाठी पुढील काळात मोठा मेळाव्याचे नियोजन करायचे असे सर्वानुमते ठरले.या बैठकीत नारायण आप्पा पाटील व अनिकेत निगडे यांनी मार्गदर्शन केले
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / सोनगाव (जावली)

