वाई : सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी व गरीब शोषित पीडित जनतेसाठी सामान्य शेतकरी घरातील मुलाला आज ऑल इंडिया पॅंथर सेना यांच्या वतीने वाई मतदार संघातून विधानसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले. सातारा येथे झालेल्या बैठकीत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी जिल्हा महासचिव आशिष मोरे यांची कामगिरी पाहून त्यांना वाई मतदार संघातून तिकीट जाहीर केले आहे. आशिष मोरे यांनी अगोदर ज्या पक्षांमध्ये होते त्या पक्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे काम करून वाई मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस 7443 एवढे मतदान उमेदवाराला दिले होते. आता या विधानसभेला ते स्वतः वाई मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / वाई
