प्रतिनिधी : अमीर इनामदार
खंडाळा : सुशिला शंकारराव गाढवे महाविद्यालय खंडाळा अर्थशास्त्र विभाग आणि IQAC समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्था कार्यपद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रदीप मेंढापुरे यांनी केले. प्राचार्य डॉ हणमंत जाधव यांच्या हस्ते उपस्थित नागेश्वर सहकारी पतसंस्था व छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था खंडाळा पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. प्रथम सत्रात सहकारी पतसंस्थांची कार्यपद्धती यावर शाखा व्यवस्थापक संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात कर्ज वसुली पद्धत यावर वसुली अधिकारी नितीन पवार यांनी मार्गदर्शन केले.तृतीय सत्रात आधुनिक बँकिंग प्रणाली यावर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे विभागीय अधिकारी दिनेश पवार यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सर्व तज्ञ मार्गदर्शकांना प्रश्नोत्तरे विचारून बँकिंग विषयावर ज्ञान मिळवले.
प्राचार्य डॉ हणमंत जाधव,प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी मनोगत व्यक्त केले,आभार प्रा. शर्मिला सावंत यांनी,प्रा.स्नेहल शिंदे, प्रा. अशाली फडतरे,प्रा.सुजाता पडळकर,डॉ. प्रतिभा पाटणे, प्रा. रोहिणी मोरे, प्रा. प्रतीक्षा माने यांनी संयोजन व परिश्रम घेतले.सृष्टी रासकर हीने सूत्रसंचालन केले. यावेळी सर्व विभाग विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खंडाळा
