सातारा : ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय नेते दीपक भाऊ केदार तसेच जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 09/10/2024 रोजी सातारा विश्रामगृह येथे बैठक करण्यात आली या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या जागा जाहीर करण्यात आल्या. वाई विधानसभेमधून ऑल ऑल इंडिया पॅंथर सेनेची जागा यावेळेस जिल्हा महासचिव आशिष मोरे यांना घोषित करण्यात आली आहे. तसेच कराड विधानसभा संघातून सिद्धार्थ गायकवाड सातारा विधानसभा संघातून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड तसेच कोरेगाव विधानसभा संघातून महिला जिल्हाध्यक्ष सविता ताई सपकाळ यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड म्हणाले आम्ही लोकसभेला आमचे स्थान काय आहे ते दाखवून दिलेल आहे. तसेच आमचे जिल्हा महासचिव आशिष मोरे यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून 7443 एवढे मतदान दिले होते, जर आम्ही दुसऱ्या उमेदवारांना एवढे मतदान देऊ शकतो तर आता आम्ही स्वतः स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सक्षम झालेले आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की "लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस" तसेच आम्ही लढणार पण आणि या घराणेशाहीला पाडणार पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार एकटा माणूस सुद्धा क्रांती करू शकतो आणि अनेक आले तरी त्याला क्रांती हेच नाव असतं म्हणून आम्ही सातारा जिल्हा मतदार संघातून जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड वाई मतदार संघातून आशिष भाऊ मोरे कराड मतदार संघातून सिद्धार्थ भाऊ गायकवाड व कोरेगाव मतदार संघातून महिला जिल्हाध्यक्ष सविता ताई सपकाळ यांची ऑल इंडिया पॅंथर सेना सातारा जिल्हा यांच्या वतीने निवड करण्यात आलेली आहे. असा ठराव आज सातारा येथे झालेल्या बैठकीमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने घेण्यात आला.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / सातारा
