राजेंद्र माने कराड शहर प्रमुख यांचा वाढदिवस उत्साहात !मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा पत्र देऊन वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी : श्री.राहुल पवार


कराड : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख शहराला सामाजिक वारसा आहे, या शहरात अनेक सामाजिक उपक्रम होत असतात शहराला राजकीय पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत शहराचा मोठा वाटा आहे, कराड शहरात गेले वीस वर्ष निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


राजेंद्र माने व कराड शहर शिवसेना यांच्या वतीने रक्तदान शिबिर करण्यात आले, यावेळी शिवसेना कराड शहर पदाधिकारी व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते शहरातील नागरिक उपस्थित होते, युवा नेते अतुल भोसले यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले याप्रसंगी अतुल भोसले म्हणाले की हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य होते की 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण याप्रमाणे कराड शहराचे ज्वलंत समाजकारणाचा वारसा घेतलेले व राजकीय क्षेत्रात वलय निर्माण करणारे राजेंद्र माने यांनी केलेल्या समाजकारण याचा आम्हाला नेहमी सार्थ अभिमान आहे. 


समाजाच्या प्रत्येक घटकात पोहोचण्यासाठी त्यांची धडपड नेहमी असते यावेळी रक्तदान शिबिर रक्तदात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला राजेंद्र माने म्हणाले की "रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आपण कुणाचातरी जीव वाचवू शकतो रक्ताचा तुटवडा कुठे पडू नये व त्यामुळे रक्तदानाच्या श्रेष्ठ दान करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना माझा मनापासून मानाचा मुजरा" याप्रसंगी राजेंद्र मानेंचा नागरिक सत्कार करण्यात आला.


राजेंद्र मानेंच्या या उपक्रमास युवक युवतींचा सुद्धा मोठा प्रतिसाद होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा पत्र देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या जयवंत शेलार अतुल भोसले राजेंद्रसिंह यादव सुलोचना पवार काकासाहेब जाधव अक्षय मोहिते यांच्यासह मोठ्या प्रमाणात कराड शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने