नव्या कृषी तंत्रज्ञानाने शेतीला ऊर्जा द्यावी ! प्राचार्य शब्बीर नालबंद

प्रतिनिधी : अमिर इनामदार 


खंडाळा : सुशिला शंकारराव गाढवे महाविद्यालय,खंडाळा 
भूगोल विभाग आयोजित अतिवृष्टीचा कृषीक्षेत्रावर होणारा परिणाम यावर चर्चासत्र आयोजन करण्यात आले.प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत भूगोल विभागप्रमुख प्रा. अशाली फडतरे यांनी केले.
राजेंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य शब्बीर नालबंद म्हणाले- भारत कृषिप्रधान देश असून जागतिक बाजारपेठेत कृषी मालाची गरज पुरवण्यासाठी भारत अग्रेसर आहे.हवामानानुसार पिकावर होणाऱ्या विविध रोगाचा होणारा परिणाम चिंतेचा विषय आहे.यासाठी शेतकऱ्यांनी नव्या कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शेती क्षेत्राला नवी ऊर्जा द्यावी असे आवाहन केले. आभार प्रा.सुजाता पडळकर यांनी मानले.


प्रा.शर्मिला सावंत प्रा.स्नेहल शिंदे,डॉ. प्रतिभा पाटणे,प्रा. रोहिणी मोरे, प्रा. प्रतीक्षा माने यांनी संयोजन व परिश्रम घेतले.विद्यार्थी अक्षय देशमाने याने सूत्रसंचालन केले. यावेळी सर्व विभाग विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / खंडाळा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने