प्रतिनिधी / अमिर इनामदार
खंडाळा : सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, खंडाळा राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना,ग्रंथालय विभाग व वाड्•मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर, २०२४ - भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन साजरा
प्रमुख वक्ते NCC व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.अमीर इनामदार म्हणाले- महापुरुष मोठे होताना आयुष्याच्या सुरुवातीला विद्यार्थी म्हणून त्यांचे जीवन समजून घेणे आवश्यक आहे, महापुरुष, सुधारकांच्या जडणघडणीत ग्रंथ आणि पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्व आहे.१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी नियमित वाचन, आकलन, उपयोजन करणे आवश्यक आहे. डॉ कलाम यांनी आपल्या आयुष्यात पुस्तक ग्रंथ वाचून आपला नैतिक,भौतिक, सामाजिक विकास केला.याप्रमाणे तरुणाईने आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी वाचन, श्रवण आणि लेखन करावे.इस्रो संशोधन संस्थेत काम करताना शस्त्र निर्मिती किंवा वापरातून विधायक बदल व्हावेत विध्वंसक नको असा विवेकी विचार दिला.
अध्यक्षीय मनोगत करताना वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. स्नेहल शिंदे म्हणाल्या वर्तमानात पुस्तक वाचन ही संकल्पना हरवलीय असं वाटत आहे, याउलट भ्रमणध्वनी अतिवापराने तंत्रज्ञान आयुध आपली वैयक्तिक माहितीची चोरी करून सामाजिक करतील अशी भीती वाटू लागली आहे याला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.
सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप मेंढापुरे
आभार प्रा.प्रतिक्षा माने यांनी केले
विद्यार्थी वाचक-आकांक्षा वळकुंदे हीने डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मी भारताला काय देऊ शकतो या लेखाचे,अमृता बरगुडे हीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वाचन केले
यावेळी ग्रंथपाल अर्चना जमदाडे, महाविद्यालय सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी वृंद उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खंडाळा

