प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य
कुडाळ (जावली) : मेढा काटवली पाचवड मार्गे पुणे बायपास ठाणे बससेवा आज पासून सुरू होत असून या गाडीचां उद्या सकाळी साडे पाच वाजता काटवली येथून शुभारंभ होणार आहे. बरेच दिवसापासून करहर कुडाळ व आलेवाडी परिसरातील नागरिकांची याबाबत मागणी होती.
याबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदिप पवार यांनी पाठपुरावा केला होता. त्याला आज यश आले असून उद्या बुधवारी सकाळी साडे पाच वाजता काटवली येथून या गाडीचा शुभारंभ होणार आहे. या बाबतचे पत्र मेढा आगारप्रमुख निता बाबर यांनी पवार यांना दिले आहे.
राज्य परिवहन मेढा आगारा मार्फत मेढा, काटवली, करहर, हुमगांव, कुडाळ, पाचवड मार्गे पुणे बायपास ठाणे अशी बस सुरू करण्यात येत आहे. सदर बसची सुटण्याची वेळ मेढा येथून सकाळी ०५.०५ व पोहचण्याची वेळ, १२.३०, तसेच ठाणे येथुन पुन्हा निघण्याची वेळ ही १४.०० अशी राहणार आहे. या बस मुळे या परिसरातील मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांना चांगली सोय होणार आहे. पंधरा वर्षापूर्वी या परिसरातील करंदी मुंबई केळघर मुंबई दापवडी मुंबई या बस सुरू होत्या त्या बंद झाल्यानंतर या विभागातून कोणतीही मुंबईसाठी बस उपलब्ध नव्हती त्यामुळे आता या बसमुळे प्रवाशांची सोय होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच या विभागातून एसटीची अजून एखादी रात्रराणी सेवा सुरू करण्यात यावी अशी देखील येथील स्थानिकांकडून मागणी होत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)
