खंडाळा / श्री.अनिल करंदकर(पाटील)
खंडाळा : सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा IQAC समिती आणि स्टाफ अॕकॅडमी आयोजित "तंत्रस्नेही प्राध्यापक आणि मूल्यांकन प्रणाली" या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी कला व वाणिज्य महाविद्यालय नागठाणे इंग्रजी विभागप्रमुख डॉ सुरेश पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी डॉ पाटील म्हणाले - "बदलत्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जाताना येणाऱ्या नव्या प्रणालीतून अहवाल भरणे आवश्यक आहेत.
महाविद्यालयामध्ये होणाऱ्या प्रत्येक विशेष समारंभ अहवाल परंपरागत पद्धतीचा वापर न करता नावीन्यता आणावी. महाविद्यालय विकास समिती,ग्रंथालय,अंतर्गत तक्रार निवारण समिती, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यासोबत क्रीडा, सांस्कृतिक,प्रसिद्धी विभाग समिती यासोबत सर्व विभागाचे उपक्रम नावीन्यपूर्ण तंत्रसंसाधनाद्वारे वेगळेपण सिद्ध करता यावेत.अध्ययन-अध्यापन कार्य करताना स्मार्ट पद्धतीने करता यावीत यासाठी प्रत्येक प्राध्यापकाने तंत्रसंसाधने वापर करत आपल्या चांगल्या आणि वेगळ्या कामाची सिद्धतेसाठी वैशिष्ट्यपूर्ण ब्लॉग तयार करावेत.विद्यार्थी कौशल्य, सामाजिक भौतिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधन घडामोडींची चिकित्सा करण्यासाठी प्रेरित व प्रवृत्त करावे असे आवाहन केले."
प्रास्ताविक व परिचय महाविद्यालय नॅक समन्वयक प्रा.स्नेहल शिंदे यांनी, स्वागत प्राचार्य डॉ हणमंत जाधव यांनी केले.आभार प्रा. सारिका सुर्वे, सूत्रसंचालन प्रा.प्रतीक्षा माने यांनी केले.यावेळी खंडाळा विभाग शिक्षण समिती संचालक वसंतराव पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती, महाविद्यालय सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी वृंद उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खंडाळा

