बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
खंडाळा : राजेंद्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, खंडाळा या दोन्ही शैक्षणिक संकुलातील NCC राष्ट्रीय छात्र सेनेतील कॅडेट्स यांनी नुकतेच भारतीय सेना व महाराष्ट्र पोलीस दलात दाखल होऊन शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला याबद्दल दोन्ही संकुलाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन जाहीर गौरव करण्यात आला या गौरव समारंभाचे संयोजन NCC वरिष्ठ विभाग अधिकारी व्ही एन गाढवे,सीटीओ नवनाथ पाचे यांनी केले. वरिष्ठ महाविद्यालय NCC समिती प्रमुख प्राध्यापक अमीर इनामदार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय मध्ये शिकणारे विद्यार्थी-
साहिल संजय येवले-बीकॉम भाग 02-महाराष्ट्र पोलीस-ठाणे शहर,
विश्वजीत जगन्नाथ मालुसरे-बीएस्सी भाग 02-भारतीय सेना तांत्रिक सेवा,
पवन संतोष धुमाळ बीएस्सी भाग 01-भारतीय सेना सामान्य सेवा
रोहन राजेंद्र जाधव-बीकॉम भाग 02-भारतीय सेना सामान्य सेवा
आणि राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयातून इ. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी सूरज अजित जगताप-भारतीय सेना सामान्य सेवा
कृतज्ञता व्यक्त करताना विश्वजीत मालुसरे म्हणाला- "माझ्या यशात व्हीएन गाढवे, नवनाथ पाचे, प्राद्यापक अमीर इनामदार सर यांच्या शिस्तप्रिय धड्यांचे विशेष योगदान आहे"
या दिमाखदार यशाबद्दल खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शिक्षण महर्षी शंकरराव गाढवे सर, सचिव संजीव(अनिरुद्ध) गाढवे, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ हणमंत जाधव, प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्य अरुंधती अनिरुद्ध गाढवे, पर्यवेक्षक धनंजय महामुनी, कार्यालयीन अधिक्षक संतोष गाढवे व सहकारी दोन्ही संकुलाचे शिक्षक, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी वृंद,विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या सर्वांना शुभेच्छा दिल्या.शिक्षक ज्ञानेश्वर ढमाळ व विद्यार्थी भागवत बिरगड यांनी छायाचित्रण केले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खंडाळा
