प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य
सातारा : द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली, साताऱ्यातील हुतात्मा स्मारक हॉल मध्ये निवडी जाहीर करण्यात आल्या.
श्री.आनंद तुकाराम गंगावणे यांची प्रसिद्धी प्रमुख सातारा जिल्हा पदी नियुक्ती
यावेळी द ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा अध्यक्ष श्री जीवन मोहिते अध्यक्षस्थानी होते, उपाध्यक्ष महेश यादव सचिव चेतन भोसले सहसचिव दीपक मांडवकर जिल्हा संपर्कप्रमुख जीवन पाटील यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून सुमारे 80 पत्रकार यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकास अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष श्री मोहिते म्हणाले ही संघटना पत्रकार तसेच समाजातील इतर घटकांसाठी काम करेल, पत्रकारांवर होणारे तसेच समाजातील विविध घटकांवर होणारे अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहिल व त्यांना मिळवून देण्याचे काम प्राधान्याने करेल.
या संघटनेमार्फत समाजातील विविध स्तरावर सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्याचा मानस मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला, त्याला सर्व मान्यवरांनी अनुमोदन दिले, सामाजिक क्रीडा शैक्षणिक कला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मधून उत्कृष्ट काम करणाऱ्यांची निवड करून त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / सातारा

