भटक्या विमुक्त जातीतील विद्यार्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार

भटक्या विमुक्त जातीतील विद्यार्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख मान.श्री सचिनजी मोहिते यांचे शेते तालुका जावली येथे विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी प्रतिपादन.

बातमी : श्री.विलास दरेकर 

कुडाळ (जावली) : शेते तालुका जावली येथे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान.श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा संघटक मान. श्री सुधीरभाऊ राऊत तसेच उपजिल्हा संघटक मान.श्री सादिकभाई बागवान यांच्या नियोजनानुसार विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी वरील प्रसंगी मत प्रदर्शन केले या प्रसंगी उपजिल्हा संघटक मान. श्री रुपेश वंजारी जावली तालुकाप्रमुख श्री. नितीन गोळे सातारा तालुकाप्रमुख श्री. सागर रायते आरोग्य सेनेचे तालुका समन्वयक श्री. प्रकाश गोळे सातारा समन्वयक श्री. हरिदास पवार जावली तालुका उपप्रमुख श्री. रवी पारटे जावलीचे मसाला किंग प्रसिद्ध उद्योगपती श्री. रविंद्र गोळे संघटक श्री. रवींद्र चिकने   शिवसैनिक युवा उद्योजक श्री. ज्ञानेश्वर शेलार  विभागप्रमुख श्री. सचिन शेलार तसेच शिक्षक श्री. राजेंद्र जाधव सर श्री. जाधव सर उपस्थित होते.



न्यूज मराठी लाईव्ह 

कुडाळ (जावली) 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने