कुडाळ : जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी महेश बारटक्के यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी दत्ता पवार तर मेढा विभागातील उपाध्यक्षपदी सुजित धनवडे खजिनदार पदी बापूसाहेब वाघ तसेच सचिव पदी विनोद वेंधे सहसचिव पदी संदीप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे कुडाळ येथे पत्रकार संघ जावली यांची वार्षिक सभा पार पडली या वार्षिक सभेमध्ये सर्वानुमते झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीत इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळत्या अध्यक्ष वसीम शेख यांनी मुजावर यांच्या हाती पत्रकार संघाचा कारभार दिला ज्यावेळी पत्रकार संघाचे सदस्य सादिक सय्यद जुबेर शेख सचिन वारागडे संतोष बेलोसे दिलीप पाडळे अंकुश कोकरे शरद रांजणे मोहसीन शेख जुबेर शेख प्रमोद पंडित विशाल जमदाडे आधी सदस्य उपस्थित होते
न्युज मराठी लाईव्ह
कुडाळ (जावली)
